साठवण पाण्याची भाग-2
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 1
खालील व्हिडीओ बघा, पाठ समजून घ्या.
स्वाध्याय.
*रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करा.
1. धरणांमुळे............ निर्मिती करणे शक्य झाले.
उत्तर. धरणांमुळे वीज निर्मिती करणे शक्य झाले.
2. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथे ..........
धरण आहे.
उत्तर. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथे जायकवाडी धरण आहे.
3. धरणांमुळे.......... उभे राहू शकले.
उत्तर. धरणांमुळे कारखाने उभे राहू शकले.
4. कोयना हे महाराष्ट्रातील एक प्रमुख ....... आहे.
उत्तर. कोयना हे महाराष्ट्रातील एक प्रमुख धरण आहे.
5. जमिनीत मुरलेले खोलवरचे पाणी...... मुळे उपसणे शक्य झाले.
उत्तर. जमिनीत मुरलेले खोलवरचे पाणी विंधन विहिरी मुळे उपसणे शक्य झाले.
6. पानपोईच्या पाण्यासाठी........
घेतला जात नाही.
उत्तर. पानपोई च्या पाण्यासाठी मोबदला घेतला जात नाही.
**जोड्या जुळवा.
अ गट. ...... ब गट
1. जायकवाडी. बोअरवेल
2. पानपोई. पाण्याच्या टाक्या
3. विंधन विहीर. मोफत पाणी
4. किल्ले. धरण
उत्तर. जायकवाडी... धरण
पानपोई.......... मोफत पाणी
विंधन विहीर...... बोअरवेल
किल्ले.............. पाण्याच्या टाक्या.
**थोडक्यात उत्तरे द्या.
1. पाणी कशासाठी साठवायचे?
उत्तर. पाणी पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी ,शेतीसाठी ,उद्योगधंद्यासाठी साठवायचे.
2. पारंपारिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवत असत?
उत्तर. पारंपारिक पद्धतीत घरात पाणी रांजण ,माठ ,हं डे,भांडे यामध्ये साठवत असत.
3. धरण कशावर बांधतात?
उत्तर. धरण नदीवर बांधतात.
4.पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी?
उत्तर. पाण्याचा वापर करताना ते वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी.
5. पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय?
उत्तर. पाणी वापरण्यायोग्य न राहणे याला पाण्याचे प्रदूषण म्हणतात..
____________________________________

0 Comments
तुमच्या प्रतिक्रिया कळवा.