Ticker

6/recent/ticker-posts

पिण्याचे पाणी, परिसर अभ्यास भाग 1. इयत्ता चौथी.

 पिण्याचे पाणी.


विषय -परिसर अभ्यास भाग 1.

इयत्ता .चौथी.


 *खालील व्हिडिओ बघा ,पाठ समजून घ्या.


स्वाध्याय.
अ. जरा डोके चालवा.

रवा आणि साबुदाणा मिसळले गेले आहेत. ते चाळून वेगळे करण्यासाठी कशी चाळणी घ्याल? ज्यातून साबुदाणा खाली पडेल अशी चाळणी का ज्यातून रवा खाली पडेल अशी चालली घ्याल?
उत्तर.. ज्यातून रवा खाली पडेल अशी चाळणी घ्यावी. म्हणजे रवा खाली पडेल आणि साबुदाणा चाळणीत शिल्लक राहील.

आ. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

1. लिंबाचे सरबत कोणकोणत्या पदार्थांचे द्रावण आहे?
उत्तर.. लिंबाचे सरबत हे साखर, मीठ आणि पाणी यांचे द्रावण आहे.

2. पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असले, तरी ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही याचे कारण काय?

उत्तर.. पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असले तरी डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्मजीव त्यात असू शकतात आणि ते पोटात गेल्यावर आजार होण्याचा धोका असतो म्हणून असे पाणी चांगले असेलच असे नाही.

3. सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण काय करतो?

उत्तर..सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण बारीक साखर वापरतो त्याच प्रमाणे ते द्रावण चांगले ढवळून घेतो.

4. तेल पाण्यात बुडते की पाण्यावर तरंगते?

उत्तर.... तेल पाण्यावर तरंगते.

ई. रिकाम्या जागा भरा.
1. साखर मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर.......... होतात.
उत्तर.. दिसेनासे.

2. पाण्यात एखादा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला........... म्हणतात.

उत्तर.. द्रावण.

3. जलसंजीवनी हे............. द्रावणांचे एक उदाहरण आहे.

उत्तर. उपयुक्त.

4. सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात. काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास...... होऊ शकतात.

उत्तर.. आजार.

5. तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा......... असतात.
उत्तर. हलक्या.

6. तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा..... असतात.
उत्तर. जड.

7. गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात...... फिरवतात.

उत्तर.. तुरटी.

उ. चुक की बरोबर सांगा.


1. तुरटीची पूड पाण्यात विरघळत नाही.

उत्तर.. चूक

2. पाण्यात सूक्ष्म जीव जगू शकत नाहीत.

उत्तर.. चूक.

3. गढूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी जमतो.

उत्तर.. बरोबर.

4. खोडरबर पाण्यात तरंगते.

उत्तर. चूक.

5. चहा गाळून त्यातील चोथा वेगळा करता येतो.

उत्तर.. बरोबर.

ऊ. पाणी पारदर्शक होते म्हणजे काय होते?

उत्तर. पाणी पारदर्शक होते म्हणजे त्यातून आर पार दिसते.
पाण्याच्या तळाशी असणारा भाग दिसतो. याला पाणी पारदर्शक झाले असे म्हणतात.

_______________________________________________________________.______

Post a Comment

0 Comments