साठवण पाण्याची भाग-1.
इयत्ता चौथी ,परिसर अभ्यास भाग 1.
खालील व्हिडीओ बघा, पाठ समजून घ्या.
स्वाध्याय.
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. आपल्याला मिळणारे सर्व पाणी कशापासून मिळते?
उत्तर. आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते.
2. पाणी का साठवावे लागते?
उत्तर.पाणी साठवले नाही तर आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही म्हणून पाणी साठवावे लागते.
3. पावसाचे जमिनीत मुरलेले पाणी कसे मिळवतात?
उत्तर. पावसाचे जमिनीत मुरलेले पाणी विहीर खणून मिळवतात.
4. पूर्वी किल्ल्यावर पाण्याची काय व्यवस्था असायची?
उत्तर. पूर्वी किल्ल्यावर पाण्यांचे तलाव असायचे,त्याचबरोबर दगडात खोदलेली पाण्याची टाकी असायची.
5. पूर्वी गावात पाण्याची काय व्यवस्था असायची?
उत्तर. पूर्वी गावात पाणी मिळण्यासाठी आड खणले जायचे.
6. पोहरा कशाला म्हणतात?
उत्तर. पूर्वी आडातून पाणी काढण्यासाठी दोरीला जे भांडे बांधले जात असे त्याला पोहरा म्हणतात.
7. पूर्वी नदीचे पाणी कसे अडवत?
उत्तर. पूर्वी नदीचे पाणी अडवण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बांध/ बंधारे बांधले जात.
8. पूर्वी तलाव कोठे बांधले जायचे?
उत्तर. पूर्वी कमी पावसाच्या भागात किंवा मोठी नदी नसलेल्या भागात तलाव बांधले जायचे.
9. पूर्वी च्या काळात पाणी साठवण्यासाठी काय व्यवस्था करत?
उत्तर. पूर्वीच्या काळात पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे.
10. पावसाळ्याचा कालावधी किती महिने असतो?
उत्तर. पावसाळ्याचा कालावधी चार महिन्यांचा असतो.
*रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.
1. पूर्वी .............. लोक राहायचे.
उत्तर. पूर्वी किल्ल्यावर लोक राहायचे.
2. पावसाचे जमिनीत मुरलेले पाणी काढण्यासाठी .......... खणत.
उत्तर. पावसाचे जमिनीत मुरलेले पाणी काढण्यासाठी विहीर खणत.
3. पूर्वीच्या काळी किल्ल्यावर दगडात खणलेली.......... असायची.
उत्तर.पूर्वीच्या काळी किल्ल्यावर दगडात खोदलेली पाण्याची टाकी असायची .
4. आटपाडी गावात प्रत्येक वाड्यात .......
होते.
उत्तर. आटपाडी गावात प्रत्येक वाड्यात आड होते.
_________________________________.

0 Comments
तुमच्या प्रतिक्रिया कळवा.