Ticker

6/recent/ticker-posts

५. "मला शिकायचंय" इयत्ता - चौथी विषय - मराठी

इयत्ता - चौथी

 विषय - मराठी

पाठ ५. मला शिकायचंय

प्रस्तावना

                  या पाठात शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे. शिक्षण हा मुलांचा अधिकार आहे, हक्क आहे. शिक्षण देताना मुलगा मुलगी भेद करणे चुकीचे आहे. नव्हे मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे हा मुलीवर अन्याय आहे. चूल आणि मूल ही मुलींची काम असतात, असं म्हणणं, साफ चुकीचे आहे. शिकायचय मला या पाठात स्नेहा नावाच्या मुलीची शिक्षणाबद्दलची तळमळ, शिकण्याची आसक्ती दाखवली आहे. सर्व मुलींनी ही गोष्ट समजून घेऊन आपले शिक्षण केले तर कुणीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही.

                  या पाठाचे लेखक आहेत बाबा गोविंदा महाजन. मराठी भाषेतील मुख्यतः बाल साहित्य लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे व यासाठी त्यांना शासनाचे पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. त्यांनी आपल्या लेखनात अहिरानी व मराठी अशा दोन भाषांचा प्रयोग केला आह.

चला तर बघूया "मला शिकायचय" हा पाठ.

खालील व्हिडीओ बघा. पाठ समजून घ्या.

दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे स्वाध्याय सोडवा




स्वाध्याय

प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा.

१. स्नेहा का रडत होती?

उत्तर. स्नेहाचे बाबा तिला पाचवीला पाठवणार नव्हते म्हणून स्नेहा रडत होती.


२. सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता?

उत्तर. सरपंचांनी बबलीला पाचव्या इयत्तेत प्रवेश घेतला होता.


३. मुख्याध्यापक आणि सरपंच सखाराम च्या घरी का गेले?

उत्तर. सखाराम स्नेहाला पुढे शिकवणार नव्हता हे त्यांना समजले होते म्हणून मुख्याध्यापक आणि सरपंच

सखाराम च्या घरी गेले.


४. स्नेहाला अतिशय आनंद का झाला?

उत्तर. स्नेहा चे बाबा तिला पाचवीला पाठवणार होते म्हणून स्नेहाला अतिशय आनंद झाला.



प्रश्न २. तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा.

१. स्नेहाची आई चिंतेत का पडली?

उत्तर.स्नेहा घराच्या एका कोपऱ्यात बसून रडत होती. रडून रडून त्याचे डोळे सुजले होते. या कारणाने स्नेहाची आई  चिंतेत पडली.


२. मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने काय सांगू लागले?

उत्तर. "सखा भाऊ ,तुमची लेक हुशार आहे .तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनू द्या", असे मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने सांगू लागले.


३. सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले?

उत्तर. "अरे सखा , तुझ्या मुली एवढीच माझी बबली. तिच्याच वर्गात मधली. तिला मी शाळेत पाठवणार आहे. पाचवीत शिकण्यासाठी. आडगाव ची शाळा येथून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. माझ्या लेकी बरोबर ती जाईन एसटीमध्ये",  असे समजुतीच्या स्वरात सरपंच सखाराम मला म्हणाले.


४. सखाराम ने शेवटी कोणता निर्णय घेतला?

उत्तर. "अपुरं शिक्षण नको. दिवस-रात्र कष्ट करून रक्ताचं पाणी करुन, मी पण माझ्या मुलीला शिकवीन." स्नेहाचं पुढचं शिक्षण करीन असा निर्णय सखारामने शेवटी घेतला.


प्रश्न - ३. शब्दसमूहांचा/ वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

१. चिंतेत पडणे - काळजी  वाटणे.

वाक्य - स्नेहा रडत होती म्हणून स्नेहा ची आई चिंतेत पडली.


२. गहिवरून येणे - मन दाटून येणे.

वाक्य -  शिकण्यासाठी स्नेहा  रडत होती म्हणून  तिच्या आईला गहिवरून आले.


३. डोळे पाणावणे - डोळ्यात अश्रू येणे.

वाक्य - स्नेहाची शिक्षण घेण्याची ओढ पाहून तिच्या आईचे डोळे पाणावले.


४. अचंबा वाटणे -  आश्चर्य वाटणे.

वाक्य - शिक्षक अचानक घरी आलेले पाहून स्नेहाला अचंबा वाटला.


५. पोटतिडकीने बोलणे - मनापासून कळकळीने बोलणे.

वाक्य -  सखाराम च्या मुलीने शिकावं म्हणून मुख्याध्यापक पोटतिडकीनं बोलत होते.


६. रक्ताचे पाणी करणे - अतिशय कष्ट करणे.

वाक्य - सखारामने रक्ताचे पाणी करून स्नेहाला शिकविण्याचा निर्धार केला.

  

 ________________________________________________________________________________





Post a Comment

2 Comments

तुमच्या प्रतिक्रिया कळवा.