Ticker

6/recent/ticker-posts

४. "या भारतात" (कविता) - विषय - मराठी - इयत्ता चौथी

इयत्ता - चौथी

विषय - मराठी


 ४. या भारतात (कविता)


कविता ऐका. अर्थ समजून घ्या. कविता तालासुरात म्हणण्याचा सराव करा.
मार्गदर्शनाप्रमाणे स्वाध्याय सोडवा.




स्वाध्याय 


प्रश्न १.एका वाक्यात उत्तरे लिहा

 १. आपल्या देशाचे नाव काय आहे?

उत्तर. आपल्या देशाचे नाव भारत आहे.


२. स्वातंत्र्य सुख कोणामध्ये निर्माण होऊ दे ,असे तुकडोजी महाराज म्हणतात?

उत्तर. स्वातंत्र्य सुख या भारतातील गरीब, श्रीमंत, हिंदू ,ख्रिश्चन, इस्लामी या सर्व लोकांमध्ये निर्माण होऊ दे, असे तुकडोजी महाराज म्हणतात.


३. या देशातील तरुण कसा असावा?

उत्तर. या देशातील तरुण उद्योगी, वीर, चारित्र्यसंपन्न असावा.


४. या भारतातील लोकांनी काय विसरून जावे?

उत्तर. या भारतातील लोकांनी जाती भाव विसरून जावा.


५. खळ निंदकाच्या मनात काय निर्माण व्हावे?

उत्तर. खळ निंदकाच्या मनात सत्य ,न्याय निर्माण व्हावे.


६.या कवितेचे कवी कोण आहेत?

उत्तर. या कवितेचे कवी तुकडोजी महाराज आहेत.


 

प्रश्न २. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

१. या भारतात.......... नित्य वसु दे

उत्तर. बंधुभाव.


२. सकळांस कळो मानवता..........

उत्तर. राष्ट्रभावना.


३............... समूळ नष्ट हो जगातूनी.

उत्तर. अस्पृश्यता.



प्रश्न ३. समानार्थी शब्द लिहा.

१. राष्ट्र- देश

२. अमीर - श्रीमंत.

३. तरुण -  युवक.

४. मानवता -  माणुसकी.

५. शील - चारित्र्य.


प्रश्न ३. विरुद्ध अर्थी शब्द लिहा.

१. गरीब X श्रीमंत

२. स्वातंत्र्य X पारतंत्र्य

३. उद्योगी X रिकामटेकडा

४. तरुण X वृद्ध

५. स्पृश्यता X अस्पृश्यता.

__________________________________________________________________




Post a Comment

0 Comments