इयत्ता चौथी विषय - मराठी
पाठ - तिसरा
आम्हालाही हवाय मोबाईल
व्हिडिओ बघा. पाठ समजून घ्या आणि मार्गदर्शना प्रमाणे स्वाध्याय सोडवा.
स्वाध्याय
प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ. मुलीला काय हवे आहे?
उत्तर. मुलीला मोबाईल हवा आहे.
आ. कॉलेजला मोबाईल कोण नेते?
उत्तर. कॉलेजला मोबाईल दादा नेतो.
इ. बाबांकडे किती मोबाईल आहेत?
उत्तर. बाबांकडे दोन मोबाईल आहेत.
ई. मुलीला मोबाइल कशासाठी हवा आहे?
उत्तर. मुलीला मोबाईल बोलण्यासाठी हवा आहे.
उ. या पाठाचे लेखक कोण आहेत?
उत्तर. या पाठाचे लेखक सूर्यकांत सराफ आहेत.
प्रश्न २. रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करा.
अ. आई, पुढल्या महिन्यात माझा........ येतोय.
आ. ताई तुझी लाडकी आणि आणि मी काय............ आहे का ग?
इ. मोबाईल फोन मुळे कोणालाही........
करता येतो.
प्रश्न ३. योग्य जोड्या जुळवा.
१. कॉम्प्युटर दूरदर्शन
२. टीव्ही. भ्रमणध्वनी यंत्र
३. मोबाईल संगणक.
प्रश्न४. समानार्थी शब्द लिहा.
१. मित्र.
२. धमाल.
३. मस्त.


0 Comments
तुमच्या प्रतिक्रिया कळवा.