सजीवांचे परस्परांशी नाते भाग-2
इयत्ता चौथी परिसर अभ्यास 1
खालील व्हिडीओ बघा, पाठ समजून घ्या.
स्वाध्याय.
*खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. माणसाला वनस्पती कडून काय काय मिळते?
उत्तर.-माणसाला वनस्पतीं कडून अन्नधान्य भाजीपाला, फळफळावळ मिळते.
2. माणसाला फुले कोणापासून मिळतात?
उत्तर-माणसाला फुले वनस्पतींपासून मिळतात.
3. माणसाला कापुस कोणापासून मिळतो?
उत्तर. माणसाला कापुस वनस्पतीपासून मिळतो.
4. वनस्पती कोणाच्या गरजा पूर्ण करतात?
उत्तर. वनस्पती माणसाच्या गरजा पूर्ण करतात.
5. सर्व सजीवांना अन्न कुठून मिळते?
उत्तर. सर्व सजीवांना अन्न परिसरातूनच मिळते.
6. वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात?
उत्तर. जीवनातला जास्तीत जास्त वेळ झाडावर घालवणाऱ्या, झाडावर राहणाऱ्या प्राण्यांना वृक्षवासी प्राणी म्हणतात.
7. म्हशींच्या पाठीवर बगळा का बसतो?
उत्तर. गवतातील कीटक खाण्यासाठी म्हशीच्या पाठीवर बगळा बसतो.
8. आंब्याच्या झाडाला मोहर/फुलोरा कधी येतो?
उत्तर. हिवाळा सुरू असतानाच आंब्याला फुलोरा /मोहर येतो.
9. आपल्याकडे कोणते ऋतू आहेत?
उत्तर. आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा ,हिवाळा हे ऋतू आहेत.
10. आपण उन्हाळ्यात कोणते कपडे वापरतो?
उत्तर. आपण उन्हाळ्यात सुती कपडे वापरतो.
11. पावसाळ्यात बाहेर जाताना आपण काय वापरतो?
उत्तर. पावसाळ्यात बाहेर जाताना आपण छत्री किंवा रेनकोट वापरतो.
12. हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून आपण कोणते कपडे वापरतो?
उत्तर. हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून आपण उबदार कपडे वापरतो.
13. हिवाळ्या चे वर्णन आणखी कोणता ऋतू असे करतात?
उत्तर. हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात.
14. प्राण्यांचे थंडीपासून संरक्षण कसे होते?
उत्तर. प्राण्यांच्या अंगावरचे केस थंडीच्या दिवसात दाट होतात त्यामुळे त्यांचे रक्षण होते.
15. पालवी कशाला म्हणतात?
उत्तर. झाडांना येणा-या कोवळ्या पानांना पालवी म्हणतात.
16. इंद्रधनुष्य कोणत्या ऋतूत दिसते?
उत्तर. इंद्रधनुष्य पावसाळा या ऋतुत दिसते.
17. बेडूक जमिनीत खोलवर का जाऊन झोपतात?
उत्तर. थंडीचा मोसम आला की बेडकांना त्याचा त्रास होतो त्यामुळे ते जमिनीत खोलवर जाऊन झोपतात.
18. बेडकांची झोप किती महिने चालते?
उत्तर. बेडकांची झोप सात-आठ महिने चालते.
19. माणूस अन्नासाठी कशावर अवलंबून असतो?
उत्तर. माणूस अन्नासाठी शेतीवर अवलंबून असतो.
20. भूक लागल्यावर सरडे काय खातात?
उत्तर. भूक लागल्यावर सरडे किडे खातात.
21. उंदीर आणि बेडूक हे कोणाचे अन्न आहे? उत्तर. बेडूक आणि उंदीर हे काही प्रकारच्या सापांच्या अन्न आहे.
22. हरणे कोणाचे अन्न आहेत?
उत्तर. हरणे वाघांचे अन्न आहे.
23. वृक्षवासी प्राण्यांची उदाहरणे सांगा.
उत्तर. माकडे, खारी, वानर ही वृक्षवासी प्राण्यांची उदाहरणे आहेत.
*महाराष्ट्रातील पुढील ठिकाणे कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहेत?
1. नागपूर...
संत्री
2. घोलवड..
चिकू
3. सासवड.
सिताफळ.
4. देवगड.
हापूस आंबा.
5. जळगाव.
केळी.
___________________________________

0 Comments
तुमच्या प्रतिक्रिया कळवा.