इयत्ता चौथीविषय- परिसर अभ्यास - २
2. संतांची कामगिरी
खालील व्हिडिओ बघा.
स्वाध्याय
प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
१. संतांनी लोकांच्या मनात कोणती भावना निर्माण केली?
उत्तर.संतांनी लोकांच्या मनात समतेची भावना निर्माण केली.
२. संतांनी लोकांना कोणत्या गुणांची शिकवण दिली?
उत्तर.. संतांनी लोकांना दया ,अहिंसा, परोपकार, सेवा ,समता ,बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली.
३. श्री चक्रधर स्वामी मूळचे कुठले राहणारे होते?
उत्तर. श्री चक्रधर स्वामी मूळचे गुजरात मधील राहणारे होते.
४. श्री चक्रधर स्वामींनी लोकांना कोणता उपदेश केला?
उत्तर. श्री चक्रधर स्वामींनी लोकांना समतेचा उपदेश दिला.
५. श्री चक्रधर स्वामी यांनी कोणता पंथ निर्माण केला?
उत्तर.श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभव पंथ निर्माण केला.
६. श्री चक्रधर स्वामींचा ग्रंथ कोणता?
उत्तर. श्री चक्रधर स्वामींचा लिळाचरित्र हा ग्रंथ आहे.
७. संत नामदेव कोणाचे निस्सिम भक्त होते?
उत्तर. संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते.
८. संत नामदेव कोणत्या गावचे राहणारे होते?
उत्तर. संत नामदेव नरसी गावचे राहणारे होते.
९. संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला?
उत्तर.संत नामदेवांनी लोकांच्या मनात धर्म रक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार निर्माण केला.
१०. संत नामदेवांनी कोणता संदेश भारतभर पोचवला?
उत्तर. संत नामदेवांनी मानव धर्माचा संदेश भारतभर पोचवला.
११. हिंदी भाषेत पदे लिहिणारे संत कोणते?
उत्तर. हिंदी भाषेत पदे लिहिणारे संत नामदेव होय.
१२. संत नामदेवांची पदे कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहेत?
उत्तर. संत नामदेवांची पदे" गुरु ग्रंथ साहिब'' या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत.
१३. संत ज्ञानेश्वर यांचे मूळ गाव कोणते?
उत्तर. संत ज्ञानेश्वरांची मुळगाव आपेगाव होते.
१४. संत ज्ञानेश्वरांची भावंडे कोणती होती?
उत्तर. संत निवृत्तीनाथ व सोपान देव, मुक्ताबाई ही संत ज्ञानेश्वरांची भावंडे होती.
१५. कोणाच्या वडिलांनी संन्यासा नंतर संसार केला?
उत्तर. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यासा नंतर संसार केला.
१६. "ताटी उघडा ज्ञानेश्वरा '',असे कोण कोणास म्हणाले?
उत्तर. असे मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना म्हणाली.
१७. ज्ञानेश्वरांना कोणाच्या उपदेशाने हुरुप आला?
उत्तर. ज्ञानेश्वरांना मुक्ताबाईच्या उपदेशाने हुरूप आला.
१८. ज्ञानेश्वरांनी लोकांना कोणता कळकळीचा उपदेश केला?
उत्तर."ईश्वरावर श्रद्धा ठेवा. सगळ्यांशी समतेने वागा. दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा'', असा उपदेश ज्ञानेश्वरांनी लोकांना केला.
१९. पूर्वीच्या काळात धर्माचे ज्ञान कोणत्या भाषेत बंदिस्त होते?
उत्तर.पूर्वीच्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत भाषेत बंदिस्त होते.
२०. ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला?
उत्तर. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला.
२१. ज्ञानेश्वरांनी लोकांना कोणती शिकवण दिली?
उत्तर. ज्ञानेश्वरांनी लोकांना बंधुभावाची शिकवण दिली.
२२. ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?
उत्तर. ज्ञानेश्वरांची समाधी आळंदी येथे आहे.
२३. दरसाल आषाढी कार्तिकी एकादशीला लोक कोठे जातात?
उत्तर. दरसाल आषाढी-कार्तिकी एकादशीला पंढरपूरला, आळंदीला जातात.
२५. श्री चक्रधर स्वामीना कोणते भेदभाव मान्य नव्हते?
उत्तर. श्री चक्रधर स्वामींना स्त्री-पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते.
_______________________________
_____________________

0 Comments
तुमच्या प्रतिक्रिया कळवा.