Ticker

6/recent/ticker-posts

पाठ 2) संतांची कामगिरी (भाग दुसरा) | इयत्ता चौथी | विषय -परिसर अभ्यास भाग -2

इयत्ता चौथी

विषय - परिसर अभ्यास - 2

पाठ 2. संतांची कामगिरी (भाग दुसरा)



स्वाध्याय

*एका वाक्यात उत्तरे लिहा.

१. संत एकनाथांचे गाव कोणते?

उत्तर. संत एकनाथांचे गाव पैठण होय.


२. संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला?

उत्तर. संत एकनाथांनी लोकांना कोणताही उच्च-नीच भेदभाव करू  नका, प्राणीमात्रांवर दया करा, असा उपदेश केला.


३. आपल्या आचरणातून एकनाथांनी लोकांच्या मनावर कोणती भावना बिंबवली?

उत्तर. आपल्या आचरणातून एकनाथांनी लोकांच्या मनावर समतेची व ममतेची भावना बिंबवली.


४. शिवाजी महाराजांच्या काळात कोणते संत होऊन गेले?

उत्तर. शिवाजी महाराजांच्या काळात संत तुकाराम व समर्थ रामदास स्वामी हे संत होऊन गेले.


५. संत तुकारामांचे गाव कोणते होते?

उत्तर. संत तुकारामांचे गाव देहू होते.


६. संत तुकारामां च्या घरी कोणता व्यवसाय होता?

उत्तर. संत तुकारामांच्या घरी शेती आणि आणि  किराणा दुकानदारी हा व्यवसाय होता.


७. संत तुकारामांनी लोकांना कर्जमुक्त कसे केले?

उत्तर. संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीत नष्ट करून लोकांना कर्जमुक्त केले.


८. संत तुकाराम कोणत्या देवाचे भक्त होते?

उत्तर. संत तुकाराम विठ्ठलाचे भक्त होते.


९. संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला?

उत्तर. "जे का रंजले गांजले. त्यांसी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा.'' हा संदेश संत तुकारामांनी लोकांच्या मनावर बिंबवला.


१०. संत तुकारामांच्या ग्रंथाचे नाव काय आहे?

उत्तर.संत तुकारामांच्या ग्रंथाचे नाव 'तुकाराम गाथा 'आहे.


११. "जय जय रघुवीर समर्थ'' ,अशी गर्जना देणारे संत कोणते?

उत्तर. "जय जय रघुवीर समर्थ'', अशी गर्जना देणारे संत रामदास स्वामी होय.


१२. संत रामदास यांचे मूळ नाव काय होते?

उत्तर. संत रामदास यांचे मूळ नाव नारायण होते.


१३. समर्थ रामदास स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला?

उत्तर. समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला.


१४. समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला?

उत्तर. समर्थ रामदासांनी" सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे '',हा संदेश लोकांना दिला.


१५. संतांच्या कामगिरीचा लोकांवर काय परिणाम झाला?

उत्तर. संतांच्या कामगिरीमुळे लोकजागृती झाली, धर्माबद्दल आदर वाढला आणि लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला त्याच प्रमाणे स्वराज्यस्थापनेच्या कार्यासाठी ही शिवरायांना त्याचा उपयोग झाला.


*रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१............ विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते.

उत्तर. संत नामदेव.


२. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्या जवळ

............ येथे जिवंत समाधी घेतली.

उत्तर. आळंदी.


३. संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते............... नदीमध्ये बुडवली.

उत्तर. इंद्रायणी.


४. समर्थ रामदासांनी बलोपासना साठी

ठिकठिकाणी.......... मंदिरे उभारली.

उत्तर. हनुमानाची.


*खालील संतांच्या ग्रंथांची नावे लिहा.

१. श्री चक्रधर स्वामी... लीळाचरित्र.

२. संत नामदेव..... हिंदी पदे.

३. संत ज्ञानेश्वर....... ज्ञानेश्वरी.

४. संत एकनाथ.. भारुडे.

५. संत तुकाराम..... तुकाराम गाथा.

६. समर्थ रामदास स्वामी... दासबोध.

____________________________________________________________


































Post a Comment

0 Comments