मराठा सरदार-भोसल्यांचे कर्तबगार घराणे
इयत्ता चौथी
इतिहास (परिसर अभ्यास भाग २)
स्वाध्याय
*एका वाक्यात उत्तरे लिहा.
१. महाराष्ट्रात शौर्याची परंपरा कोणी निर्माण केली?
उत्तर. महाराष्ट्रात मराठा सरदारांनी शौर्याची परंपरा निर्माण केली.
२. महाराष्ट्रात नेहमी कोणामध्ये लढाया होत?
उत्तर.महाराष्ट्रात नेहमी विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतान मध्ये लढाया होत.
३. मराठा जवानांना कशाचा अभिमान वाटे?
उत्तर. मराठा जवानांना लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात अभिमान वाटे.
४. जिजाबाई ह्या कोणाच्या कन्या होत्या?
उत्तर. जिजाबाई ह्या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या.
५. मराठा सरदारांना कोणती दृष्टी नव्हती?
उत्तर. स्वकीयांच्यासाठी एक होऊन काहीतरी करावी ही दृष्टी मराठा सरदारांना नव्हती.
६. महाराष्ट्रात शौर्य कोणी जिवंत ठेवले?
उत्तर. महाराष्ट्रात मराठा सरदारांनी शौर्य जिवंत ठेवले.
७. महाराष्ट्रातील कोणते घराने शूर निघाले?
उत्तर. महाराष्ट्रातील वेरुळचे भोसले घराणे शूर निघाले.
८. वेरूळच्या लेण्या जवळ येईल शिवालया चे नाव काय आहे?
उत्तर. वेरूळच्या लेण्या जवळील शिवालया चे नाव घृष्नेश्र्वरआहे.
९. घृष्नेश्र्वर चा जीर्णोद्धार कोणी केला?
उत्तर.घृष्नेश्र्वर चा जीर्णोद्धार मालोजीराजांनी केला.
*अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा.
अ गट. ब गट
अ. सिंदखेडचे. १. निंबाळकर
आ. फलटणचे. २. घोरपडे
इ. जावळीचे. ३. भोसले
ई. मुधोळचे. ४. मोरे
५. जाधव.
उत्तरे.
सिंदखेडचे.. जाधव
फलटणचे.. निंबाळकर
जावळीचे.. मोरे
मुधोळचे.. घोरपडे.
*रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.
१. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरुळचे......... घराणे मोठे पराक्रमी निघाले.
उत्तर. भोसले.
२. संतांनी लोकांच्या मनात........ निर्माण केला.
उत्तर. भक्तिभाव.
३. जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे.......... समजत.
उत्तर. राजे.
४. एक शिवभक्त शिवाच्या पिंडीवर...... वाहत असे.
उत्तर. बेल फुल.
___________________________________________________________

0 Comments
तुमच्या प्रतिक्रिया कळवा.