मराठा सरदार-भोसल्यांचे कर्तबगार घराणे (भाग 2)
परिसर अभ्यास भाग 2, इयत्ता चौथी.
खालील व्हिडीओ बघा. पाठ समजून घ्या.
स्वाध्याय
प्रश्न १. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.अ. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरुळचे............ घराणे मोठे पराक्रमी निघाले.
(मोरे, घोरपडे, भोसले)
उत्तर. भोसले.
आ. बाबाजीराजे भोसले यांना मालोजी व............... ही दोन मुले होती.
(विठोजी, शहाजी, शरीफजी)l
उत्तर.. विठोजी.
इ..निजाम शहा चा............. हा कर्तबगार वजीर होता.
(मलिक अंबर, फत्तेखान, शरीफजी)
उत्तर. मलिक अंबर.
प्रश्न २. नातेसंबंध लिहा.
अ. मालोजीराजे-- विठोजीराजे
उत्तर. भाऊ भाऊ
आ. शहाजीराजे.. लखुजी जाधव
उत्तर... जावई -.सासरे
इ. शहाजीराजे-शरीफजी
उत्तर. भाऊ भाऊ
ई. बाबाजी राजे.. विठोजीराजे
उत्तर. वडील -मुलगा.
प्रश्न ३. अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा.
अ गट. ब गट
अ. सिंदखेडचे. १ निंबाळकर
आ. फलटणचे. २. घोरपडे
इ. जावळीचे. ३. भोसले
ई. मुधोळचे. .४. मोरे
..,. .५. जाधव
उत्तरे -
सिंदखेडचे जाधव
फलटणचे निंबाळकर
जावळीचे मोरे
मुधोळचे घोरपडे.
प्रश्न ४. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ. घृष्णे श्र्व राच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला?
उत्तर. घृष्णे श्र्व राच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केला.
आ. निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्याची जहागिरी दिली?
उत्तर. निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागिरी दिली.
इ. निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले?
उत्तर. निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर आणि शहाजीराजे निकराने लढले.
ई. आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला?
उत्तर. आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला.
__________________________________________________________

0 Comments
तुमच्या प्रतिक्रिया कळवा.