इयत्ता - चौथी
विषय - मराठी
१. धरतीची आम्ही लेकरं
वरील व्हिडिओ बघून कवितेचा अर्थ आणि चाल समजून घ्या. कविता तालासुरात गाण्याचा सराव करा आणि खालील स्वाध्याय सोडवा.
स्वाध्याय
१. एका वाक्यात उत्तरे लिहा
अ. भाग्यवान कोण आहेत?
ब. मुले कोणा प्रमाणे गाणार आहेत?
क. शेतात कोणते पीक डोलत आहे?
ड. मुले काय स्थापन करणार आहेत?
इ. धरतीच्या मुलांची एकता कशी आहे?
२. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.
अ. शेतावर जाऊया
.......... गाऊया.
आ. स्थापू समानता
पोलादी..........
३. समानार्थी शब्द लिहा.
अ. लेकरं
आ. धरती
इ. मेहनत
ई. साल भर
उ. धनी
ऊ. चाकर
४. विरुद्धार्थी शब्द लिहा.
अ. मालक
आ. नोकर
इ. भाग्यवान
५. शेवटी "र" असलेले शब्द शोधून लिहा.
उदाहरणार्थ - लेकरं.
__________________________________________________________________________________


0 Comments
तुमच्या प्रतिक्रिया कळवा.