Ticker

6/recent/ticker-posts

2. बोलणारी नदी विषय - मराठी इयत्ता - चौथी


इयत्ता चौथी

विषय मराठी

पाठ दुसरा. -  बोलणारी नदी

पाठ ऐका. स्वाध्याय समजून घ्या.

               मुलांनो तुम्हाला मौज मस्ती करायला आवडते ना? खेळायला, फिरायला, गप्पागोष्टी करायला ,दुसऱ्यांच्या खोड्या करायला तुम्हाला आवडते ना? अभ्यासापेक्षा अशा कामात मुलांना अधिक आनंद मिळतो. आपल्या मनासारखे घडावे असे त्यांना वाटत असते. तसे झाले नाही तर मुलं प्रसंगी नदी, डोंगर, पर्वत,  समुद्र ,प्राणी ,पक्षी या अवतीभोवतीच्या आपल्या मित्रांना बोलते करतात. या सर्वांच्या भावना ते स्वतःच्या शब्दातून व्यक्त करतात.

        अशीच एक मुलगी आहे बरं का! ती कोणाशी बोलते ,माहित आहे? ती बोलते चक्क एका नदी बरोबर! आपल्या मनासारखे घडत नाही म्हणून ती नदीशी मैत्री करते. नदी बरोबर बोलते आणि आपल्याला पाहिजे तसे वागण्याचा प्रयत्न करते.

    चला तर मग बघुया अशाच एका खोडकर, गंमत करणाऱ्या मुलीची गोष्ट. गोष्टीचे नाव आहे बोलणारी नदी.


स्वाध्याय सोडवण्यासाठी खालील व्हिडिओचे मार्गदर्शन घ्या.


 






Post a Comment

0 Comments