इयत्ता - चौथी
विषय - परिसर अभ्यास भाग १
पाठ 1. प्राण्यांचा जीवनक्रम
खालील व्हिडीओ बघा.
पाठ समजून घ्या.
स्वाध्याय
अ. जरा डोके चालवा.
१. कोंबडीच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात. इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का?
उत्तर. इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला कमी जास्त दिवस लागत असतात. हा कालावधी सर्व पक्षांचा सारखा नसतो.
२. गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. अंडे सुरवंट कोश आणि प्रौढ या चार अवस्थांपैकी ही कोणती अवस्था आहे?
उत्तर. गवतात भिरभिरणारा चतुर ही ही प्रौढ अवस्था आहे.
४. पावट्याच्या किंवा मटाराच्या शेंगा निवडायला घेतल्या, की कधीकधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात. कीटकाच्या वाडीतील चार अवस्थांपैकी ती कोणती अवस्था असते?
उत्तर. ती अळी अवस्था असते.
आ. थोडक्यात उत्तरे लिहा.
१. कोंबडीला अंडी का उबवावी लागतात?
उत्तर.. अंड्यामध्ये पिलांची ची वाढ होण्यासाठी अंड्यांना उबेची ची गरज असते, अंड्यांना ऊब मिळण्यासाठी कोंबडी अंड्या वर बसून त्यांना ऊब देते.
२. अंडी उगवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते?
उत्तर. अंडी उभारण्याच्या काळात अंड्यांच्या काळजीपोटी कोंबडी आक्रमक बनते . अंड्यांच्या जवळ कोणी गेले तर ती त्याच्या अंगावर धावून जाते.
३. फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था कोणत्या?
उत्तर. फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था अंडे,अळी ,कोश आणि प्रौढ या आहेत.
४. कोष या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोण कोणते बदल होतात?
उत्तर.. कोष या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीराला सहा लांब पाय आकर्षक पंख तयार होऊन प्रोड फुलपाखरू बाहेर पडते.
इ. चूक की बरोबर ते सांगा.
१. शेळीचे पिल्लु अंड्यातून बाहेर येते.
उत्तर. चूक
२. मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत.
उत्तर. बरोबर
३. अंड्यातून फुलपाखराचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते.
उत्तर. चूक
ई .गाळलेले शब्द भरा.
१. फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर.............. घालते.
उत्तर.. अंडी
२. फुलपाखरांच्या............... सुरवंट म्हणतात.
उत्तर. अळीला.
उपक्रम
१.बिबळ्या कडवा या फुलपाखराचे चित्र काढा आणि रंगवा.
२.इतर फुलपाखरांची रंगी चित्रे जमा करा आणि वही चिकटवा.
________________________________________________________________


0 Comments
तुमच्या प्रतिक्रिया कळवा.