इयत्ता- चौथी
विषय -परिसर अभ्यास - 1
पाठ 2. सजीवांचे परस्परांशी नाते (भाग पहिला)
खालील व्हिडीओ बघा.
पाठाचा उरलेला भाग पुढच्या व्हिडिओत शिकवण्यात येईल.
स्वाध्याय
प्रश्न१. एका वाक्यात उत्तरे लिहा.
१. कोणत्या झाडाला पारंब्या असतात?
उत्तर. वडाच्या झाडाला पारंब्या असतात.
२. आपण नाग वेलाची पाने कशासाठी वापरतो?
उत्तर. नाग वेलाची पाने खाण्यासाठी वापरतो.
३ पळसाच्या पानांचा काय उपयोग होतो?
उत्तर. पळसाच्या पानांचा पत्रावली बनवण्यासाठी उपयोग होतो.
४. मेथीचे पाने कशासाठी वापरतात?
उत्तर. मेथीचे पाने भाजीसाठी वापरतात.
५. कढीलिंबाची पाने कशासाठी वापरतात?
उत्तर. कढीलिंबाची पाने सर्व भाज्यांसाठी वापरतात.
६. सजीवांच्या गर्जा कोठे पूर्ण होतात?
उत्तर. सजीवांच्या गरजा परिसरातूनच पूर्ण होतात.
प्रश्न २.रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
१. फुलामधल्या गोड.............. फुलपाखरे आपली भूक भागवतात.
उत्तर. मकरंदवर
२. मासे पाण्यात........... करतात.
उत्तर. श्वसन
३. पानकणीस............ वाढते.
उत्तर. पाण्यात.
४. बेडूक............ खाते.
उत्तर. किडे.
५. जिथे गरजा पूर्ण होतात, तिथेच ........... आढळतात.
उत्तर. सजीव.
प्रश्न ३.खालील प्राण्यांच्या निवाऱ्या चे नाव लिहा.
१. वाघ.
उत्तर. गुहेत.
२. हरीण.
उत्तर. गवतात./झाडांच्या आड.
३. माकड
उत्तर. झाडावर.
४.गाय
उत्तर. गोठ्यात
५ कोंबडी.
उत्तर. खुराड्यात.
______________________________________________________


0 Comments
तुमच्या प्रतिक्रिया कळवा.